Lek Ladki Yojana 2026: मुलींना मिळणार Rs. 1,01,000 - ऑनलाईन अर्ज - TodayJob.org

     महाराष्ट्र सरकारची मुलींसाठी सर्वात मोठी योजना – लेक लाडकी योजना 2026 ची संपूर्ण माहिती TodayJob.org वर. मी या योजनेचे सर्व नवीन GR आणि अपडेट्स रोज कव्हर करतो.या योजनेअंतर्गत पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुलीला जन्मापासून 18 वर्षांपर्यंत एकूण Rs. 1,01,000 ची मदत मिळते.

योजनेचे टप्पे - TodayJob.org Exclusive

मुलीचे वय / टप्पा मिळणारी रक्कम
मुलीच्या जन्मावर ₹5,000
इयत्ता 1 ली मध्ये प्रवेशावर ₹6,000
इयत्ता 6 वी मध्ये प्रवेशावर ₹7,000
इयत्ता 11 वी मध्ये प्रवेशावर ₹8,000
वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर ₹75,000
एकूण लाभ ₹1,01,000

पात्रता - कोण अर्ज करू शकतो?

  1. मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा
  2. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न Rs. 1 लाखापेक्षा कमी असावे
  3. फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक पात्र
  4. कुटुंबात जास्तीत जास्त 2 मुलींना लाभ (3री मुलगी असेल तर 2 मुलींनंतर कुटुंब नियोजन केले असेल तर पात्र)
  5. महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
  6. बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक

लागणारी कागदपत्रे.

  • मुलीचा जन्म दाखला
  • आई-वडिलांचे आधार कार्ड
  • पिवळे / केशरी रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला (1 लाखापेक्षा कमी)
  • बँक पासबुक
  • अधिवास प्रमाणपत्र
  • कुटुंब नियोजन प्रमाणपत्र (दुसऱ्या मुलीसाठी)

अनुक्रमणिका

ऑनलाईन अर्ज कसा करावा? Step by Step

  1. lek-ladki.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. नवीन अर्जदार नोंदणी करा.
  3. लॉगिन करून Lek Ladki Yojana फॉर्म उघडा.
  4. मुलीची आणि पालकांची माहिती भरा.
  5. सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  6. फॉर्म सबमिट करा आणि पावती डाउनलोड करा.

अर्ज अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा सेतू केंद्रातून ऑफलाईन सुद्धा भरता येतो.

तुमच्या गरजू मित्रांना नक्की पाठवा🙏

  • तुम्हाला दरमहा Rs. 1500 हवे असतील तर आमची Majhi Ladki Bahin Yojana 2026 सुद्धा पहा.
  • मुलींच्या शिक्षणासाठी Mahadbt Scholarship 2026 वर Rs. 50,000 मिळवा.

Q1. Lek Ladki Yojana 2026 मध्ये किती पैसे मिळतात?
  ->   एकूण Rs. 1,01,000 पाच टप्प्यांमध्ये मिळतात. जन्मावर 5000, 1लीत 6000, 6वीत 7000, 11वीत 8000 आणि 18 वर्षांनंतर 75000.

Q2. Lek Ladki Yojana साठी उत्पन्न मर्यादा किती आहे?
->   कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न Rs. 1 लाखापेक्षा कमी असावे आणि पिवळे/केशरी रेशन कार्ड असावे.

Q3. एका कुटुंबातील किती मुलींना लाभ मिळेल?
->    जास्तीत जास्त 2 मुलींना. जर तिसरी मुलगी असेल तर दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तरच तिसऱ्या मुलीला लाभ मिळेल.

Q4. Lek Ladki Yojana चा फॉर्म कुठे भरायचा?
->   lek-ladki.maharashtra.gov.in वर ऑनलाईन किंवा अंगणवाडी / ग्रामपंचायत मध्ये ऑफलाईन भरता येतो.

Q5. Lek Ladki Yojana आणि Ladki Bahin Yojana मध्ये फरक काय?
->   Lek Ladki ही जन्मलेल्या मुलीसाठी (Rs 1,01,000) आहे तर Ladki Bahin ही 21-65 वयोगटातील महिलांसाठी (Rs 1500 दरमहा) आहे. दोन्हीचा लाभ एकाच कुटुंबाला घेता येतो.

1 thought on “Lek Ladki Yojana 2026: मुलींना मिळणार Rs. 1,01,000 – ऑनलाईन अर्ज”

  1. Pingback: Mahadbt Scholarship 2026: Apply Online, Rs 50,000

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top