CWC भरती 2026 - थोडक्यात माहिती
जर तुम्ही गेल्या काही वर्षांपासून सरकारी नोकरीचा अभ्यास करत असाल, तर तुम्हाला माहित असेल की Central Warehousing Corporation (CWC) ची भरती दरवर्षी येत नाही. TodayJob.org वर मी गेल्या 7 वर्षांपासून PSU आणि नवरत्न कंपन्यांच्या नोकऱ्यांचे analysis करत आहे आणि माझ्या अनुभवातून सांगतो – जेव्हा CWC 300+ जागा काढते, तेव्हा ती सुवर्णसंधी असते.अधिकृत जाहिरात क्र. CWC/I-Manpower/DR/Rectt/2026/01 दिनांक 17.10.2026 ही cewacor.nic.in वर प्रसिद्ध झाली आहे. TodayJob.org च्या टीमने संपूर्ण PDF वाचून तुमच्यासाठी सोप्या मराठीत सर्व माहिती काढली आहे, जेणेकरून तुम्हाला कायदेशीर भाषेत वेळ वाया घालवावा लागणार नाही.
CWC भरती 2026 - TodayJob.org ने PDF मधून काढलेली थोडक्यात माहिती
Central Warehousing Corporation ही भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक नवरत्न कंपनी आहे. ही कंपनी शेतीमालाच्या वैज्ञानिक साठवणुकीसाठी आणि CFS, ICD, Air Cargo सारख्या logistics साठी काम करते.ही कंत्राटी नोकरी नाही, ही कायमस्वरूपी केंद्र सरकारी नोकरी आहे. यामध्ये IDA पगार, CPF, Gratuity, LTC, Medical आणि Performance Related Pay मिळतो.
| तपशील | माहिती |
|---|---|
| संस्था | Central Warehousing Corporation (नवरत्न) |
| जाहिरात क्र. | CWC/I-Manpower/DR/Rectt/2026/01 |
| एकूण जागा | ३२७ जागा |
| पदे | Assistant Manager आणि Junior Executive |
| अर्ज पद्धत | Online (ऑनलाईन) |
| अर्ज तारीख | १७.१०.२०२६ ते १५.११.२०२६ |
| वयोमर्यादा | १८ ते २८ वर्षे (१५.११.२०२६ रोजी) |
| अधिकृत वेबसाइट | www.cewacor.nic.in |
| अपडेट | TodayJob.org |
पदनिहाय जागांची सविस्तर माहिती
बऱ्याच वेबसाइट फक्त 327 जागा लिहितात. पण ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकीच्या पोस्ट कोडमुळे reject होतात, ते मी गेल्या 7 वर्षात पाहिले आहे. म्हणून मी तुम्हाला Page 1 आणि 2 वरील अचूक माहिती देत आहे.
A. Assistant Manager - पगार Rs. 40,000 - 1,40,000 (E-1 Grade)
- Post Code 01 – Assistant Manager (General) – 70 जागा: MBA / PG Diploma वाल्यांसाठी सर्वात मोठी संधी. माझ्या अनुभवानुसार या पदावरून AGM पर्यंत जलद promotion मिळते. पात्रता: कोणत्याही शाखेतील 2 वर्षांची Post Graduation Degree/Diploma. UR-28, OBC-23, SC-09, ST-03, EWS-07.
- Post Code 02 – Assistant Manager (Technical) – 60 जागा: Agriculture पदवीधरांसाठी माझी सर्वात आवडती पोस्ट. CWC ही मूळतः कृषी warehousing कंपनी असल्याने Technical अधिकाऱ्यांना जास्त मान असतो. पात्रता: B.Tech Agriculture / Food Technology / Biotechnology.
- Post Code 03 – Assistant Manager (Finance) – 10 जागा: खूप कमी जागा. पात्रता: B.Com + 3 वर्षे Finance अनुभव किंवा कोणतीही पदवी + CA Inter / CMA Inter. Articleship अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही, हे Page 7 वर स्पष्ट लिहिले आहे.
- Post Code 04,05,06 – Assistant Manager (Engineering) – 31 जागा: Civil – 22, Electrical – 05, Mechanical – 04. BE/B.Tech पाहिजे.
B. Junior Executive - पगार Rs. 29,000 - 93,000 (S-V Grade)
- Post Code 07 – Junior Executive (General) – 78 जागा: कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी. फक्त Computer आणि MS Office चे ज्ञान लागते. Interview नाही.
- Post Code 08 – Junior Executive (Technical) – 78 जागा: B.Sc Agriculture, Botany, Zoology, Biotechnology, Chemistry वाल्यांसाठी.
TodayJob.org चा Expert सल्ला: जर तुम्ही साधे Graduate असाल आणि MBA नसेल, तर JE General ला अर्ज करा. 78 जागा आहेत आणि Interview नाही. फक्त Online Test वर निवड होते. मी अनेक विद्यार्थ्यांना पहिल्याच प्रयत्नात ही नोकरी मिळवताना पाहिले आहे.
पात्रता - 15.11.2026 रोजी काय लागेल?
शिक्षण: Page 6 नुसार 15.11.2026 पर्यंत तुमच्याकडे अंतिम वर्षाची मार्कशीट असणे बंधनकारक आहे. CWC ने स्पष्ट लिहिले आहे “अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकत नाहीत.” दरवर्षी 10-15% फॉर्म याच कारणामुळे reject होतात. TodayJob.org वर आम्ही आधीच सावध करतो.
वयोमर्यादा आणि सूट: किमान 18, कमाल 28 वर्षे UR साठी. सर्व सूट मिळून कमाल वय 55 पेक्षा जास्त होता कामा नये.
- SC/ST: 5 वर्षे सूट
- OBC: 3 वर्षे सूट
- PwBD: 10 वर्षे सूटमाजी सैनिक: 5 वर्षे + JE साठी अजून 3 वर्षे
OBC प्रमाणपत्र: तुमचे OBC-NCL प्रमाणपत्र हे FY 2025-26, 2024-25, 2023-24 च्या उत्पन्नावर आधारित आणि 01.04.2026 नंतरचे पण 15.11.2026 च्या आधीचे असावे.
निवड प्रक्रिया कशी होईल?
Assistant Manager (01 ते 06): Online Test + कागदपत्र पडताळणी + Interview. अंतिम मेरिट = Online Test + Interview.
Junior Executive (07 आणि 08): फक्त Online Test + कागदपत्र पडताळणी. Interview नाही.
पगार, सुविधा आणि बॉण्ड - नोकरी घ्यावी का?
100% घ्यावी. मूळ पगाराव्यतिरिक्त:
- Assistant Manager: मूळ Rs. 40k-1.40L, हातात साधारण Rs. 65,000 – 75,000
- Junior Executive: मूळ Rs. 29k-93k, हातात साधारण Rs. 45,000 – 55,000
- इतर सुविधा: CPF, Pension, Gratuity, LTC, Performance Related Pay (मूळ पगाराच्या 40% पर्यंत), स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी Medical खर्च.
अर्ज कसा करावा - Step by Step
- www.cewacor.nic.in -> Careers वर जा
- Advt No. CWC/I-Manpower/DR/Rectt/2026/01 वर क्लिक करा
- मोबाईल आणि email ने Register करा
- फॉर्म भरा, फोटो, सही, अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित declaration अपलोड करा
- फी भरा आणि प्रिंट काढून ठेवा